बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘आर्या’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. त्यानंतर आता नुकतंच बहुचर्चित ‘आर्या’ या वेब सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या सिझनमध्ये सुष्मिता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘आर्या २’ मधील सुष्मिताच्या अभिनयामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. सुष्मिताच्या अभिनयाचे सर्वचजण कौतुक करत आहे. नुकतंच बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेही तिचे कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. सोशल मीडियावर अनेकदा तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच सलमानने इन्स्टाग्रामवर एक आर्या २ या वेबसीरिजच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. याद्वारे त्याने तिचे कौतुक केले आहे.

हा फोटो शेअर करताना सलमानने त्याची खास मैत्रीण सुष्मिताचे फार कौतुक केले आहे. तसेच या फोटोला कॅप्शन देताना तो म्हणाला, “अरे वाह सुष, तू फार छान दिसतेस. फारच सुंदर. तुझ्यासाठी मी फार खूपच आनंदी आहे.” यासोबत त्याने त्याची ही पोस्ट सुष्मितालाही टॅग केली आहे.

सलमानच्या या पोस्टला रिपोस्ट करत तिनेही सलमानचे खास आभार मानले आहेत. ‘यू आर माय जान सलमान खान, तुझ्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद’ अशा आशयाचे कॅप्शन तिन या फोटोला दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुष्मिता सेन आणि सलमान खान हे बॉलिवूडमधील खास मित्रांपैकी एक आहेत. या दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. दरम्यान सध्या सुष्मिताची आर्या २ ही वेबसीरिज प्रचंड चर्चेत आहे. १० डिसेंबरला ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. आर्या ही सुष्मिताची पहिलीच वेबसीरिज होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये चंद्रचूड सिंह दिसला होता. या शिवाय सिकंदर खेरचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.