बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कधी लग्न करणार? हा जणू काही जागतिक प्रश्नच झाला आहे. त्याचे आजवर अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले आहे. पण कधीही सलमानने प्रेमात असल्याची कबूली दिली नाही. अशातच सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सलमानने सोनाक्षी सिन्हाशी लग्न केल्याचे दिसत आहे. पण खरच सलमानने लग्न केले का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या फोटोमध्ये सलमान खान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला अंगठी घालताना दिसत आहे. दरम्यान, सलमानने ब्लेझर घातले आहे तर सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली आहे. सोनाक्षी या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोवरुन सलमान आणि सोनाक्षीने गुपचुप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

पण व्हायरल झालेल्या फोटो मागचे सत्य जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सलमानने खरच सोनाक्षीशी लग्न केले का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. व्हायरल होणारा फोटो फोटोशॉपमध्ये एडिट केलेला आहे. सलमानने अद्याप लग्न केलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान आणि सोनाक्षीमध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे. सोनाक्षीने सलमानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता.