Samantha Ruth Prabhu Celebrates Diwali with Rumoured Boyfriend Raj Nidimoru : समांथा रुथ प्रभू ही आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ही अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते.
सोमवारी (२० ऑक्टोबर) तिने एक पोस्ट शेअर केली. तिने दिवाळी सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड राज निदिमोरू याच्याबरोबरच्या तिच्या फोटोने. अलीकडेच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये समांथा रुथ प्रभूने या वर्षीच्या तिच्या दिवाळी सेलिब्रेशनमधील अनेक फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये ती तिचा कथित बॉयफ्रेंड राज निदिमोरू याच्याबरोबर हा प्रसंग साजरा करताना दिसली. या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, “कृतज्ञतेने भरलेली.”
तिच्या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये हृदय आणि प्रेमाच्या इमोजी शेअर केल्या. अनेकांनी तिला “सर्वांत सुंदर”, “तुम्ही खूपच छान दिसत आहात” असेही म्हटले. अफवा अशी आहे की, समांथा रुथ प्रभू दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करीत आहे. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर त्याच्याबरोबरचे सुंदर फोटो शेअर करते. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले आहे. राज निदिमोरूचे यापूर्वी श्यामली डेशी लग्न झाले होते. २०२२ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.
राज निदिमोरू कोण आहे?
राज निदिमोरू हा लोकप्रिय दिग्दर्शक आहे. राजने अनेक सुपरहिट वेब सीरिज केल्या आहेत. मनोज बाजपेयीसह ‘द फॅमिली मॅन’, शाहिद कपूरसह ‘फर्जी’ आणि वरुण धवन व समांथा यांच्यासह ‘सिटाडेल हनी बनी’ यांसारख्या वेब सीरिजसाठी राजने काम केलं आहे. तसेच तो सिनेसृष्टीतही खूप सक्रिय असतो.
परंतु, समांथा रुथ प्रभूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ३७ वर्षी तिनं २०१७ मध्ये नागा चैतन्यबरोबर लग्न केलं होतं. दोघांनी २०१५ मध्ये डेटिंग सुरू केली. या जोडप्याने ६ ऑक्टोबर २०१७ रोजी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदू पद्धतीने लग्न केले. पण, दोघांचा संसार चार वर्षही टिकला नाही. २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नागाने अभिनेत्री शोभिता धुलिपालबरोबर दुसरे लग्न केले. त्यामुळे आता समांथादेखील दुसरे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.