तुम्ही स्वत:ला तंदरुस्त ठेवू इच्छित असाल आणि त्यासाठी व्यायामाची योजना आखण्यासाठी कोणत्या प्रेरणेची आवश्यकता असेल तर अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त तुमची प्रेरणा बनण्यासाठी पुरेसं कारण आहे. बॉलिवूडच्या इतर ‘फिटनेस फ्रीक’ अभिनेत्रींप्रमाणेच मान्यता दत्तने देखील तिचा वर्कआउट मोड ऑन केलाय. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक वर्कआउट व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमधला तिचा वर्कआउटचा अंदाज पाहून फक्त फॅन्स नव्हे तर इतर सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

या व्हिडीओमध्ये मान्यता दत्त जिममध्ये केबल क्रॉस ओव्हर करताना दिसून आली. यावेळी तिने व्हाईट टॉप आणि प्रिंटेड ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली दिसून येतेय. तिच्या चाहत्यांना व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तिने हा व्हिडीओ शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maanayata Dutt (@maanayata)

हा व्हिडीओ पाहून मान्यता दत्तच्या फॅन्ससोबतच अभिनेत्री मनिषा कोईराला आणि अभिनेता अली फजल यांनी देखील तिचं कौतुक केलंय. ४२ वर्षीय मान्यता दत्त स्वतः फिट ठेवण्यासाठी नेहमीच व्यायाम करते आणि अनेकदा तिच्या चाहत्यांना व्यायाम करण्यास आणि निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यास प्रेरित करत असते. तिचा हा वर्कआउट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मान्यता दत्तने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच ४ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Manyata-Dutt-Workout-video-viral-inside
(Photo: Instagram@maanayata)

मान्यता दत्त बद्दल आणखी सांगायचं झालं तर तिचं खरं नाव दिलनवाज शेख असं आहे. कामानिमित्त ती मुंबईत आली होती. २००३ मध्ये तिला प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटातील एका गाण्यात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिला ‘मान्यता’ नावाने सगळे जण ओळखू लागले. अभिनेता संजय दत्त आणि मान्यताची पहिली भेट २००२ मध्ये झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये त्या दोघांनीही लग्नगाठ बांधली.