अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करून तिने तिचा चाहता वर्ग तयार केला आहे. ती इन्स्टग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत या चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेकदा सारा तिचे मजेशीर व्हिडीओही शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सारा अली खान जया बच्चन यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सारा अली खानने कॉफी घेण्याआधी आणि नंतरचे तिचे दोन मूड दाखवले आहेत. सर्वात आधी सारा अली खान स्टुडिओमध्ये तिच्या हेअरस्टायलिस्टबरोबर ‘बाहों में चले आओ’ या गाण्यावर प्रेमळ आणि शांतपणे डान्स करताना दिसत आहे. पुढे कॉफी घेतल्यानंतर काही वेळातच सारा ‘टिंकू जिया’वर तिच्या हेअरस्टायलिस्टबरोबर रस्त्यावर टपोरी डान्स करताना दिसते. साराचे हे कॉफीआधी आणि कॉफीनंतरचे दोन्ही मूड तिच्या चाहत्याना आवडल्याचं दिसतंय. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांना भरभरून लाईक्सचा वर्षाव केलाय. तर, अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. ‘सारा तू खरंच वेडी आहेस’, असं एका चाहत्याने कमेंट करून म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सारा ही कॉफीप्रेमी असल्याचं तिच्या व्हिडीओतून कळतंय. हा व्हिडीओ शेअर करताना सारा अली खानने कॅप्शन दिलंय की, “अपियरन्स vs रिअॅलिटीचं अचूक व्हर्जन. वाइल्ड आणि क्रेझी ही आमची मानसिकता असते”. साराचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना फार आवडल्याचं दिसतंय. साराच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’मध्ये दिसली होती. लोकांना हा चित्रपट आवडला होता. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.