scorecardresearch

शाहरुख खानने बदलीली मन्नतची Name Plate, केले इतके पैसे खर्च

शाहरुख लवकरच ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे.

shah rukh khan, mannat,
शाहरुख लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे शाहरुख चर्चेत असतो. पण यावेळी शाहरुख एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा बंगला मन्नत सोशल मीडियावर ट्रेण्ड करत होता. याचं कारणही खास होतं. काही दिवसांपूर्वी शाहरुखने त्याच्या बंगल्यावर नावाची पाटी बसवली आहे. शाहरुखच्या घराबाहेर नेहमीच चाहत्यांची गर्दी असते. त्यावेळी काही चाहत्यांनी अनेक वर्षांनी त्याच्या घराच्या नावाची पाटी बसवली हे लक्षात आलं आणि मन्नत सोशल मीडियावर ट्रेण्ड होऊ लागलं.

आणखी वाचा : अमृता- प्राजक्तामध्ये सवाल जवाबाची जुगलबंदी, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील नव्या लावणीची झलक

आणखी वाचा : ऐश्वर्या अभिषेक आणि दीपिकासोबत डान्स करताना झाली बेधुंद…, पाहा Video

शाहरुखच्या घरा समोर असलेल्या या नावाच्या पाटीची डिझाइन त्याची पत्नी गौरी खानने केली आहे. गौरीच्या टीमने मिळून ही नावाची पाटी बनवली आहे. मात्र, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नावाच्या प्लेटची किंमत आहे. मन्नतच्या नावाच्या प्लेटची किंमत ही सुमारे २० ते २५ लाख रुपये आहे. तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी पाटीसाठी एवढा खर्च करण्याची काय गरज असा प्रश्न अनेकांना विचारला आहे.

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने ‘झिरो’ चित्रपटात अखेरचं काम केलं होतं. यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. लवकरच तो सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. याशिवाय नयनतारा आणि सान्या मल्होत्रासोबतही त्याचा एक चित्रपट लवकरच येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shah rukh khan new mannat nameplate costs 20 lacs dcp

ताज्या बातम्या