अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना रविवारी अटक करण्यात आली. आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. त्यामुळे आर्यनला जेल होणार की बेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे हे किल्ला कोर्टात उपस्थित आहेत. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडत आहे. यावेळी ते आरोपींच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता कोणाच्या बाजूने निर्णय लागतो यावर सर्वजण लक्ष ठेवून आहेत.
Aryan Khan : वेश बदलून एनसीबीचे अधिकारी क्रूझवर पोहोचले अन्…; नेमकं काय घडलं त्या रात्री?
दरम्यान कोर्टात हजर करण्यापूर्वी आर्यन खानची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. यासाठी त्याला जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी आर्यन खानची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा – आर्यन खानला मोठा दिलासा; NCB कोठडीची मुदतवाढ मागणार नसल्याची माहिती
‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली. यादरम्यान एकाला ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांना ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात आणले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आज दुपारी न्यायालयापुढे हजर करणार
अरबाज आणि आर्यन दोघेही एकाच खोलीत राहात होते. आर्यनवर सेवनाचा, तर उर्वरित दोघांवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून आर्यन, अरबाज आणि मूनमून धमेचा यांना सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. त्यामुळे आर्यन खानसह मूनमून आणि अरबाज यांना रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच घालवावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
धक्कादायक! आर्यन खान गेल्या चार वर्षांपासून घेत होता ड्रग्ज, चौकशीत खुलासा
न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. या तिन्ही आरोपींना सोमवारी दुपारी पुन्हा न्यायालायापुढे हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानसह मूनमून आणि अरबाज यांना रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच घालवावी लागणार आहे.
आर्यन खानला अटक का जामीन?; वकील सतीश मनेशिंदे यांचा कोर्टात युक्तिवाद; म्हणाले…