देशभरात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशात एकीकडे करण जोहरच्या वाढदिवासाच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या ५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असताच एकामागोमाग एक बॉलिवूड सेलिब्रेटी देखील करोना संक्रमित झाल्याचं समजतंय. कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ यांच्या नंतर आता अभिनेता शाहरुख खानची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

शाहरुख खाननं नुकतंच त्याचा आगामी चित्रपट ‘जवान’चं पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं. त्यानंतर आता शाहरुखला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शाहरुख खाननं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्याच्या कुटुंबीयांकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शाहरुख खान काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाला होता. या पार्टीनंतर अलिकडच्या काळात, अभिनेता अक्षय कुमार, कतरिना कैफ, कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर यांना करोनाची लागण झाली आहे.

आणखी वाचा- करण जोहरच्या वाढदिवसाची पार्टी ठरली सुपर- स्प्रेडर? तब्बल ५५ जणांना करोनाची लागण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बॉलिवूड हंगमा’च्या रिपोर्टनुसार, करण जोहरच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रेटींमधील जवळपास ५०-५५ जणांना करोनाची लागण झाली आहे. पण बदनामीच्या भीतीने ते करोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती देत नाहीयेत. सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहरच्या जवळच्या मित्रपरिवारातील बऱ्याच लोकांना या पार्टीनंतर करोनाचं संक्रमण झालं आहे. अनेकांनी करोना संक्रमित असल्याची माहिती लपवली आहे. पण त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.