महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आज (१८ सप्टेंबर) सकाळपासूनच लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा लोकांच्या घरोघरी विराजमान झाला आहे. कलेचा देवता असलेल्या बाप्पाचे आगमन बी-टाउनमधल्या कलाकार मंडळींच्याही घरी झाले.

हेही वाचा- ‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’, रितेश-जिनिलीयाचा रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “दादा-वहिनी…”

सामान्य माणसांसाठी कलाकारांच्या घरचा बाप्पा कूतुहलाचा विषय असतो. मराठीसह, हिंदी आणि साऊथच्या अनेक कलाकारांनी मोठ्या उत्साहात आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली. अनेकांनी आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याकडे यंदाही बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिल्पाच्या घरी दरवर्षी लालाबागच्या राजाची प्रतिकृती स्थापन केली जाते. यंदाही तिने हीच परंपरा कायम ठेवत गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.

सुपरस्टार राम चरणनेही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली. रामचरणने बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

मराठीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाला आहे. मोरया मोरयाचा जागर करत स्वप्नीलने बाप्पाची मनोभावे प्रार्थना केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरी गपणती बाप्पाचा आगमन झालं आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर बाप्पाचा फोटो शेअर केला आहे. अल्लू अर्जूनने इको फ्रेंडली गणेश मुर्तीची स्थापना केली आहे.