दिग्गज अभिनेते कमल हासन यांची लेक श्रुती हासनचं ब्रेकअप झालं आहे. तिचं बॉयफ्रेंड शातनू हजारिकासोबतचं चार वर्षांचं नातं संपलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते बॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी श्रुती सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. तिने व शांतनूने आता आपापल्या आयुष्यात वेगळ्या वाटा निवडल्या आहेत.

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या श्रुती हासन आणि तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका वेगळे झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शांतनूबरोबरचे फोटो शेअर केले होते, तेही हटवले आहेत. श्रुती आणि शंतनू यांच्यात काही वैयक्तिक समस्या होत्या त्यामुळे त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जातंय. पण अद्याप दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

श्रुती आणि शांतनू काही वर्षांपासून डेटिंग करत होते आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहत होते. ते अनेकदा एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावायचे. ते सार्वजनिकपणे एकमेकांवरील प्रेम जाहीर करायचे. शांतनू हा एक प्रसिद्ध डूडल आणि मल्टीडिस्पलनरी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. त्याने रफ्तार, डिवाईनसह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींबरोबर काम केलंय.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रुतीने अजून ब्रेकअपबद्दल प्रतिक्रिया दिली नसली, तरी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली होती. “हा एक खूप चांगला प्रवास होता, मला स्वतःबद्दल आणि लोकांबद्दल खूप काही शिकायला मिळालं,” असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.