विराजस कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात अभिनेत्री सखी गोखले, सुव्रत जोशी आणि सूरज पारसनीस प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. नाटकातील तिघांच्या अभिनयासह विराजसचं भरभरून कौतुक होतं आहे. सखीची आई आणि सुव्रतच्या सासू म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी नुकतीच ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकावर प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्री शुभांगी गोखलेंच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ ‘वरवरचे वधू-वर’ नाटकाच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत शुभांगी गोखले म्हणाल्या, “आताच ‘वरवरचे वधू-वर’चा मुंबईतला शुभारंभचा प्रयोग बघितला. याआधी काही रिहर्सल बघितल्या होत्या. पण आज संपूर्ण प्रयोग बघताना फार मजा आली. मराठी नाट्यविश्वात एक पुन्हा नवीन पिढी सखी, सुव्रत, विराजसच्या निमित्ताने आली. याचा खूप आनंद आणि अभिमान वाटला. कारण की मला मराठी नाटकांविषयी फार अभिमान आहे. मराठी नाटक, लेखक, दिग्दर्शक आणि मुख्यतःहा प्रेक्षक हे भारतामध्ये कुठेही असे नाहीये. म्हणजे बुधवारी दुपारी किंवा बुधवारी सकाळी अगदी ११ वाजता एखादं नाटकं हाऊसफुल्ल करणारा आपला प्रेक्षक आहे. त्यांच्यासमोर हे नवीन पिढीचं नाटक येताना मला थोडी धाकधूक होती. पण आज जो प्रतिसाद मिळाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. दोघांबद्दल आदर वाढला.”

हेही वाचा – Video: ‘तौबा-तौबा’ गाण्यावरील आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स व्हिडीओ पाहून विकी कौशल भारावला, प्रतिक्रिया देत म्हणाला…

पुढे शुभांगी गोखले म्हणाल्या, “मराठी नाटकावर प्रचंड प्रेम करणारी नट मंडळी, दिग्दर्शक लेखक आणि प्रेक्षक यांच्याबद्दल पुन्हा एक आदर वाढला. खूप मजा आली आणि तटस्थपणे प्रेक्षक म्हणून नाटक बघताना खूप प्रयत्न करावे लागले. कारण सखीकडे बघून सारखं भरून येत होतं. मला कधी कल्पना नव्हती की सखी पूर्ण वेळ मराठी नाटकाला देईल. यासाठी मनात जिद्द असावी लागते. त्यामुळे हे तिने केलं त्याचा मला आनंद झाला आणि तिने बखूबी भूमिका निभावली आहे.”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम इरिनाचा गणेशोत्सवात जबरदस्त डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले, “ही आपली संस्कृती आहे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुव्रत तर उत्कृष्ट अभिनेता आहेच. तो खूप हुशार नट आहे. रंगभूमीवरील परंपरा त्याच्यात काहीतरी आपलं योगदान द्याव, ही तळमळ त्याचं नाटक करण्यामागे आहे. फक्त आपल्या दोघांना मालिकेमुळे ओळखतात. मग आपण त्या ग्लॅमरचा फायदा घेऊन एक नाटक करू, असं अजिबात नाहीये. हे मला माहित होतं. पण त्याचा प्रत्यय आज आला. लोकांनी पण खूप उचलून धरलं. खूप कौतुक केलं. मला त्याचा फार आनंद आहे. तिघांना खूप शुभेच्छा,” असं शुभांगी गोखले म्हणाल्या. दरम्यान ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचे प्रयोग येत्या काळात दादर, पनवेल, मुलुंड, बोरिवली या ठिकाणी आहेत.