छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान तिने ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तर तिच्या या वक्तव्यामुळे ती अडचणीत सापडली आहे. श्वेता ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेताने इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिच्या या व्हिडीओमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

श्वेता तिवारीने नुकतंच इंस्टाग्रामवर एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती लाल रंगाचा ड्रेस घालून बोल्ड डान्स करताना दिसत आहे. एका हॉटेलमधील कॉरिडॉरमध्ये ती डान्स करत आहे. यात तिच्यासोबत पायल सोनीही नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने याला हटके कॅप्शनही दिले आहे. ‘सुतळी बॉम्बसोबत सकाळचा डान्स’, असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

श्वेताने या व्हिडीओदरम्यान एका इंग्रजी गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यात Kiss My A** असे एक वाक्य आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. श्वेताचा हा व्हिडीओ काही मिनिटाताच व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हि़डीओ तिची मुलगी पलक तिवारी हिनेही शेअर केला आहे. श्वेता तिवारीच्या या व्हिडीओखाली ‘आम्हाला तुझी लाज वाटते’, ‘माफी माग’, ‘अटक करा’, अशा विविध कमेंट पाहायला मिळत आहे.

“माझ्या ब्रा चे माप…”, अभिनेत्री श्वेता तिवारीने ब्रा साईज आणि देवाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान श्वेता तिवारी नुकतंच आपली आगामी बेव सीरिज ‘शो स्टॉपर’च्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये आली होती. या वेब सीरिजमध्ये रोहित रॉय, सौरभ जैनदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. आपल्या सहकलाकारांसोबत मंचावर उपस्थित होते. यावेळी श्वेता तिवारीने हे वक्तव्य केलं. “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे”, असं तिने म्हटलं आणि तेथून वादाला सुरुवात झाली. श्वेता तिवारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.