scorecardresearch

“हा मराठीतील ‘वजनदार’चा कॉपी…” सोनाक्षी सिन्हाच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाच्या टीझरवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

परत म्हणाल की बॉयकॉट गँगमुळे चित्रपट फ्लॉप होता, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे.

“हा मराठीतील ‘वजनदार’चा कॉपी…” सोनाक्षी सिन्हाच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाच्या टीझरवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच सोनाक्षी सिन्हाचा बहुचर्चित ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या ३० सेकंदाच्या या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यात सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी या बॉडी शेमिंग आणि वाढलेले वजन याबद्दल बोलताना दिसत आहे. मात्र अनेकांनी हा टीझर पाहून मराठीत प्रदर्शित झालेल्या वजनदार चित्रपटाची आठवण झाली आहे.

डबल एक्सएल हा चित्रपट बॉडी शेमिंग या गंभीर विषयावर मजेशीरपणे भाष्य करतो. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात दोन मैत्रिणींच्या संभाषणाने होते. यात हुमाने निळा टुपीस आणि ब्लॅक जॅकेट परिधान केले आहे. तसेच त्यावर चष्माही लावला आहे. तर सोनाक्षीने गुलाबी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. यात सोनाक्षीने तिचे केस हिरव्या रंगाने हायलाइट केले आहेत. या दोघींचा हटके लूक हा फार व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “… अन् आजही मी त्यावर ठाम” सोनाली कुलकर्णीबद्दल बोलताना अमृता खानविलकरने दिले होते असे उत्तर

यात सोनाक्षी आणि हुमा एकमेकांच्या मैत्रिणी दाखवल्या आहेत. त्यात हुमाला म्हणते, जग किती विचित्र आहे, ते एखाद्या ओव्हरसाइज कुर्त्यामध्ये लपलेली चरबीही शोधतात. आपण आपल्या श्वास रोखून पँट घालण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी जिन्स काही वर चढत नाही. ती मध्येच अडकते. त्यावर सोनाक्षी म्हणते, मुलांच्या मागण्याही फार विचित्र असतात. त्यांना ब्रा मोठी हवी. पण कंबर मात्र एवढीशीच…जर आम्ही तुमच्याकडून लहान मोठे असे काही मागितले तर तुम्ही काय कराल? यानंतर त्या दोघीही जणी फार जोरजोरात हसतात.

सोनाक्षी आणि हुमाचा डबल एक्सएल या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींना हा टीझर पाहून मराठी अभिनेत्री प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांच्या वजनदार चित्रपटाची आठवण झाली आहे. यावर एका नेटकऱ्याने वजनदार चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कमेंट केली आहे. काही तरी स्वत:चे मूळ बनवा. परत म्हणाल की बॉयकॉट गँगमुळे चित्रपट फ्लॉप होता, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने हा वजनदार या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे का?? असा प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा : ‘मॅडम तुमचं लग्न कधी होणार?’, चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली…

दरम्यान डबल एक्सएल हा चित्रपट बॉडी शेमिंग या विषयावर आधारित आहे. यात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यांच्याबरोबर जहीर इकबाल आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महत राघवेंद्र हे कलाकारही प्रमुख भूमिका साकारणार आहेत. महत राघवेंद्र हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonakshi sinha and huma qureshi upcoming movie double xl teaser out internet claims it a copy of marathi film vazandar nrp

ताज्या बातम्या