बॉलिवूडची ‘दबंगगर्ल’ म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात  राहते. तसंच अनेकदा तिला ट्रोल केलं जातं. नुकतंच सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ सेशन केलं होतं. त्यावेळस काही नेटकऱ्यांनी सोनाक्षीला असभ्य प्रश्न विचारले होते. या प्रश्नांचे मजेशीर उत्तर देत सोनाक्षीने त्या नेटकाऱ्याना चांगलेच सुनावले आहे.

सोनाक्षी तिच्या इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. नुकताच तिने फॅन्सशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ सेशन केलं होतं. यात तिचे फॅन्स तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होते. दरम्यान काही नेटकरी तिला असभ्य प्रश्न विचारताना दिसले. मात्र तिने आपला संयम सोडला नाही आणि त्या प्रश्नाचे चोख उत्तर देताना दिसली. एका युजरने तिला विचारले की ,”असं काय केलं पाहिजे, ज्याने वजन कमी होईल?” यावर सोनाक्षीने उत्तर दिलं की,” तुम्ही हवा खा”. दुसरा युजरने तिला तिच्या पायाचे पोटो शेअर करायला सांगितले होते. त्यावर तिने नकार दिला.

sonakshi-sinha
Photo-Sonakshi Sinha Instagram

एक युजरने असभ्यतेची सीमा ओलंडत तिला तिचे बिकिनीमधील काही फोटो शेअर करायला सांगितले. तर तिने त्या फॅनची इच्छा पूर्ण करत बिकिनीचा फोटो शेअर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
sonakshi-sinha-1
Photo-Sonakshi Sinha Instagram

यापूर्वी सोनाक्षीने ट्रोलर्सपासून सुटका करून घेण्यासाठी ट्विटरचा निरोप घेतला होता. तिने ही माहिती तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारा चाहत्यांना दिली होती. सोनाक्षी सिन्हा ‘फोर्स २’ आणि ‘अकिरा’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली आहे. तसेच तिच्या ‘कलंक’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.