आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरणाऱ्या हिरकणीची कथा लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी खास बातचीत केली. यावेळी तिने ‘हिरकणी’ साकारण्यापासून ते चित्रपट तयार होण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासातील अनुभवाचं कथन केलं.

‘हिरकणी’ या भूमिकेला न्याय देण्यासाठी सोनालीने तीन वर्ष अथक परिश्रम केले. अगदी तिच्या बोलण्याच्या लहेजापासून ते हुबेहूब हिरकणीप्रमाणे दिसण्यापर्यंत सोनालीने विशेष मेहनत घेतली. इतकंच नाही तर तिने तिच्या आहारातही बदल केला होता. सोबतच जीममध्ये रोज घाम गाळल्यानंतरही ती मैदानी व्यायाम प्रकार करत होती, असं तिने सांगितलं.

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
prathamesh parab wife kshitija ghosalkar special ukhana
“प्रेम आमचं खरंय, नाही थिल्लर ‘टाइमपास’…”, प्रथमेश परबच्या पत्नीचा भन्नाट उखाणा! म्हणाली, “अहोंसाठी…”

दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे