थलपथी विजय साऊथ सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार आहेत. त्याचे करोडो चाहते आहेत. विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. थलपथी विजयबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे. अगामी चित्रपटासाठी विजयने तब्बल २०० कोटी रुपये मानधन घेतलं असल्याची चर्चा सुरू आहे. मानधनाच्या बाबतीत विजयने सलमान, शाहरुखसारख्या बॉलीवूड कलाकारांनाही मागे टाकलं आहे.
हेही वाचा- ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जय श्री राम’ गाण्याने केला नवा रेकॉर्ड, अवघ्या २४ तासांत…
‘लिओ’ चित्रपटानंतर थलपथी विजय वेंकट प्रभूसोबत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर विजयने आपल्या अगामी चित्रपटासाठी २०० कोटी रुपये मानधन घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘मास्टर’ चित्रपटासाठी त्याने ८० कोटी रुपये फी घेतली होती. मात्र, आता अचानक त्याने आपल्या मानधनात दुपटीने वाढ केल्याचं सांगण्यात येत आहे.‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जय श्री राम’ गाण्याने केला नवा रेकॉर्ड, अवघ्या २४ तासांत…
सूत्रांच्या माहितीनुसार, थलपती विजयचा चाहतावर्ग पाहता निर्मातेही या अभिनेत्याला मोठी फी देण्यास तयार आहेत. विजयला चित्रपटात घेतलं म्हणजे चित्रपट सुपरहिट ठरणार याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे विजयला हवं ते मानधन देण्यास निर्माते तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.
थलपथी विजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो लवकरच ‘लिओ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर संजय दत्तही दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कनगराज यांनी केलं आहे. हा चित्रपट १९ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी विजयचा ‘वारीसू’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत होती.