‘आशिकी’ या १९९० साली प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटातील नायक-नायिकेची कथा प्रेक्षकांना फारच भावली होती. या चित्रपटातील गाणीही अजरामर ठरली होती. आजही अनेकांच्या तोंडी चित्रपटातील गाणी ऐकायला मिळतात. २०१३ साली या चित्रपटाचा सिक्वेल असलेला ‘आशिकी २’ प्रदर्शित करण्यात आला. आशिकी प्रमाणेच ‘आशिकी २’ हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला होता.

‘आशिकी २’ मध्ये बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेडं लावलं होतं. चित्रपटातील आदित्य आणि श्रद्धाची जोडीही हिट ठरली होती. आता लवकरच ‘आशिकी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आशिकी ३’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा >> “मी आरएसएसमध्ये सहभागी होण्यासाठी…”, केआरकेचं ट्वीट चर्चेत

कार्तिकसह ‘आशिकी ३’ चित्रपटात नायिकेची भूमिका कोण साकारणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची नावेही पुढे आली होती. दीपिका पदुकोण, क्रिती सेनॉन किंवा श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. परंतु, या चित्रपटात आता प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

हेही वाचा >> Big Boss 16 : ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरे पुन्हा करणार कल्ला?, हिंदीच्या नव्या पर्वात दिसणार असल्याची चर्चा

मीडिया रिपोर्टनुसार, ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना ‘आशिकी ३’ चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे. रश्मिका कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आशिकी ३’साठी एका नवीन जोडीच्या शोधात चित्रपटाची टीम होती. कार्तिक आणि रश्मिकाने यापूर्वी स्क्रिन शेअर केलेली नाही. बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींसह कार्तिक पडद्यावर दिसला आहे. प्रेक्षकांनाही कार्तिक आणि रश्मिकाला एकत्र बघायला आवडेल.

हेही वाचा >> Video : ‘वाजले की बारा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह नोरा फतेहीने धरला ठेका; लावणी डान्सचा व्हिडीओ एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मिकाने ‘पुष्पा’ चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुनच्या नायिकेची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता बॉलिवूड चित्रपटात तिला बघण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.