कलाक्षेत्रातील मंडळींचं खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरतं. काही कलाकार मंडळी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत उघडपणे भाष्य करताना दिसत नाहीत. पण काही कलाकार सोशल मीडियाद्वारे खुलेपणाने व्यक्त होताना दिसतात. अशाच एका अभिनेत्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दाक्षिणात्य अभिनेते विजया कृष्ण नरेश यांनी चौथं लग्न केलं आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा – इंदौरमध्ये केलेलं थाटामाटात लग्न, १९ वर्षांच्या संसारानंतर मराठमोळ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, म्हणाली, “मानसिक त्रास…”

नरेश यांची तिसरी पत्नी राम्या रघुपती यांचा घटस्फोट झाला. त्यानंतरच त्यांनी चौथं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या तीन लग्नांपासून नरेश यांना तीन मुलं आहेत. त्यांची तिसरी पत्नी राम्या या त्यांच्यापेक्षा वयाने २० वर्ष लहान आहेत. पवित्रा लोकेश यांच्याबरोबर त्यांनी चौथं लग्न केलं आहे.

इतकंच नव्हे तर याबाबत आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. पवित्रा यांचंही हे तिसरं लग्न आहे. पवित्रा यांनी सॉफ्टवेअर इंजिनीयरबरोबर पहिलं लग्न केलं. त्यानंतर अभिनेता सुचेंद्र प्रसादबरोबर त्यांनी दुसरं लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सुचेंद्र व पवित्रा यांना दोन मुलंही आहेत.

आणखी वाचा – Video : ४५ वर्षांची मैत्री तुटली! सतीश कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसून ढसाढसा रडले अनुपम खेर, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुचेंद्र व पवित्रा यांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर २०२१पासून नरेश व पवित्रा लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या दोघांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चाही रंगल्या. गेली दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नरेश यांच्या चौथ्या लग्नाची सध्या कलाक्षेत्रामध्ये जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.