सनी देओलचा ‘चूप’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात दुलकर सलमान, सनी देओल, पूजा भट्ट, श्रेया धन्वंतरी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी श्रेया सध्या चर्चेत आली आहे. तिच्या ‘चूप’मधील भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. आता तिच्या खासगी आयुष्याबाबत काही गोष्टी समोर आल्या आहेत.

आणखी वाचा – Video : लेडीजच फर्स्ट का? जिनिलिया देशमुखचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

श्रेयाने मेहनत करत चित्रपटांमध्ये काम मिळवलं. पण कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिची परिस्थिती फारच बिकट होती. कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. तसेच बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी श्रेया कशी राहत होती हेदेखील तिने सांगितलं आहे.

ती म्हणाली, “करिअरमधील पहिला चित्रपट मिळवण्यासाठी मला १० वर्ष लागली. मी कलाक्षेत्रामध्ये कसं पदार्पण केलं हे मला विचारू नका. कारण त्याचं उत्तर माझ्याकडेही नाही. माझ्याजवळ पैसे नसायचे. राहण्यासाठी जागा नव्हती. बऱ्याचदा मी उपाशी राहिली आहे. मला अजूनही कधी कधी प्रश्न पडतो की मी हे यश कसं मिळवलं.”

आणखी वाचा – Koffee With Karan 7 : “डेविड धवन यांना डेट करत होतास का?” विचारलेल्या प्रश्नावर करण जोहर म्हणाला….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चित्रपटांमध्ये काम करणं माझ स्वप्न होतं. मी हे स्वप्न माझ्यापर्यंतच सीक्रेट म्हणून ठेवलं. कारण माझ्यासारख्या लोकांनी हे स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण होणं कधी शक्यच होणार नाही असं मला वाटायचं. मी आज या जागेवर आहे याबाबत मला विश्वास बसत नाही.” असंही श्रेयाने यावेळी सांगितलं. याआधी श्रेया नेटफ्लिक्लसच्या ‘लूप लपेटा’ चित्रपटामध्ये दिसली होती.