लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे अखेर विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईत राजेशाही थाटात अंकिता-विकीचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या या लग्नसोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. तसेच अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीनेही अंकिता लोखंडेचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहे.

अंकिताने तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना ती म्हणाली, प्रेमात संयम असतो, पण आपल्या दोघांमध्ये तो नाही. आता आपण अधिकृतपणे मिस्टर आणि मिसेस जैन आहोत, असे म्हणत तिने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

अंकिताने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर अनेक नेटकरी अभिनंदन करताना दिसत आहेत. यावेळी अंकिता आणि विकी अत्यंत सुंदर दिसत असून ही जोडी ‘मेड ऑफ इच अदर’ असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. तसेच पूजा गौरपासून मौनी रॉय, कुशल टंडनपर्यंत अनेक सेलिब्रिटी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीनेही अंकिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने एक छान कमेंट लिहिली आहे. “अभिनंदन, नवविवाहित जोडप्याला खूप खूप शुभेच्छा. श्वेता,” असे तिने लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विकी जैनला डेट करण्यापूर्वी अंकिता सुशांत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणांमुळे २०१६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतचे निधन झाले. या काळात अंकिताने सुशांतची बहिण आणि तिच्या कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता.