‘कौन बनेगा करोडपती’या शोमध्ये कायमच बिग बी अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत दिलखुलास संवाद साधत असतात. एवढचं नव्हे तर शोमध्ये हॉट सीटवर बसणारे स्पर्धकदेखील बिग बींसोबतच आपले अनुभव शेअर करत मनसोक्त गप्पा मारतात. नुकताच या शोचा एक धमाल प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यात साहिल या स्पर्धकाने बिग बींना असे काही प्रश्न विचारले की त्यांची बोलतीच बंद झाली.

या शोमध्ये हॉटसीटवर बसलेला विद्यार्थी साहिलने ७ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पल्ला गाठला आहे. तर शोमध्ये त्याने त्याच्या आवडत्या कलाकारांबद्दल सांगितलं. साहिल अभिनेता सलमान खानचा फॅन आहे. तर तापसी पन्नू ही त्याची आवडती अभिनेत्री आहे. यावेळी साहिलने तापसीबद्दल बिग बींनी असे काही प्रश्न विचारले की ते कोड्यात पडले. बिग बींनी साहिलच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की नाही हे तर येत्या भागात कळेलच मात्र तापसीने ट्विटरवरून साहिलच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय.

कविता कौशिकने रंगीला गर्लला केलं कॉपी, उर्मिला मातोंडकरने केली कमेंट

साहिलनेन तापसी पन्नू ही त्याची आवडी अभिनेत्री असण्यासोबतच त्याची क्रश, प्रेम आणि सर्व काही आहे असं सांगितलं. तापसी पन्नू फिट असण्यामागचं कारण त्याने बि बींनी विचारलं. “सर ती इतकी फिट कशी तुम्हाला तर आतल्या गोष्टी माहित असतील…तसं तिला कोणता पदार्थ आवडतो?” साहिलने असे अनेक प्रश्न विचारताच बिग बींची मात्र बोलती बंद झाली.

या मजेशीर प्रोमोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळतेय. एवढचं नव्हे तर खुद्द तापसीने साहिलच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. ट्विटरवर प्रोमो शेअर करत तापसीने लिहिलं, “साहिल मला छोले भटुरे खूप आवडतात. कधी भेट झालीच तर नक्कीच एकत्र खाऊयात. सध्या सात कोटींपर्यंत पोहचल्याबद्दल तुला खूप शुभेच्छा” असं म्हणत तिने साहिलच्या प्रश्नाचं उत्तर देत त्याचं अभिनंदन केलंय.

ट्विंकल खन्नाने ‘स्क्विड गेम्स’च्या एपिसोडशी केली आर्यन खानच्या अटकेची तुलना, म्हणाली “बातमी वाचली तेव्हा मलाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


दरम्यान या भागात साहिलने सात कोटीपर्यंतचा टप्पा गाठल्याने हा भाग पाहणं खूपचं उत्सुकतेचं असेल. तसचं साहिलने त्याच्या आयुष्यातील संघर्षदेखील सांगितला आहे.