‘तारक मेहता…’बबिता रमली जुन्या आठवणीत, ‘शोले’ चित्रपटातल्या कालियासोबत थ्रोबॅक फोटो शेअर करत म्हणाली…

मुनमुनने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

taarak mehta ka ooltah chashmah, babita ji,
मुनमुनने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील बबिताच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बबिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच मुनमुनने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत मुनमुने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुनमुनने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मुनमुनने अभिनय क्षेत्रातील तिच्या काही जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. दरम्यान, एका फोटोत मुनमुन ‘शोले’ चित्रपटात असलेल्या कालियासोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत, “जेव्हा माझ्या नवीन घरात शिफ्ट झाली, तेव्हा सुटकेसमधून सामान काढत असताना हे फोटो मिळाले. ‘हम सब बाराती’ या माझ्या पहिल्या शोमधले काही फोटो. तेव्हा लहान होते, नुकतीच कॉलेजला फस्ट इयरला गेले होते”, असे मुनमुन म्हणाली.

आणखी वाचा : माझे पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळेच मला…; कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

पुढे मुनमुन म्हणाली, “तर, पहिला फोटो हा माझ्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा आहे. माझा अनुभव शून्य होता..! इतरांसमोर माझे पाय थंड पडायचे, माझ्या डायलॉग्समध्ये गडबड व्हायची, जो पर्यंत मी शिकले नाही तो पर्यंत मला टोमणे मारायचे किंवा माझ्यावर हसायचे. मला माझ्या आयुष्यात मिळालेल्या सगळ्या अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah babita ji opens her box of full of memories appeared with kalia of film sholay dcp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या