‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय शोमध्ये भिडे मास्तरांच्या मुलीची म्हणजेच सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानूशालीने हा शो सोडला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत असले. निधीला भटकंतीची आवड असून तिच्या या भटकंतीचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तर अनेकदा निधी तिच्या बोल्ड लूकमुळे देखील चर्चेत आली आहे.

नुकतेच निधीने काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत निधी निसर्गाच्या सानिध्यात ट्रीपची मजा लुटताना दिसतेय. तिने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि रिप्ड जिन्स परिधान केलीय. निधीच्या या फोटोला अनेकांनी पसंती दिलीय. मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे टप्पूने केलेल्या कमेंटने. निधीच्या या फोंटोवर ‘तारक मेहता…’मध्ये लहान टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीने कमेंट केली आहे. या कमेंटवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मस्त जिन्स’ अशी कमेंट भव्यने केली आहे.

आराध्या बच्चनचा ‘जय सिया राम’ आरती गातानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले “चांगले संस्कार”


टप्पूने म्हणजेच भव्य गांधीने केलेल्या कमेंटवर प्रतिक्रिया देत एक युजर म्हणाला, “टप्पू बेटा मस्ती नाही.” तर आणखी एक युजर म्हणाला, “भव्य भावा ही तर तुला भावच देत नाही” आणखी एक युजर म्हणाला, “टप्पू बेटा आता बस खूप झालं, मस्ती नाही करायची बाळा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
(Photo-Instagram@Nidhi Bhanushali)


दरम्यान निधीच्या या फोटोवर कमेंट करत अनेकांनी तिच्या या लूकला पसंती दिलीय. निधी आणि भव्यने ‘तारक मेहता…’या शोमध्ये लहानग्या सोनू आणि टप्पूची भूमिका साकारली होती. २०१७ सालामध्ये भव्यने मालिकेला निरोप दिला होता.