तारक मेहतामधील सोनू व्हायरल मिम्समुळे संतापली; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

“विनोदाच्या नावाखाली कलाकारांचा अपमान करणं थांबवा”

सोशल मीडियावर सध्या ‘मिम्स’ हा प्रकार तुफान लोकप्रिय झाला आहे. एखाद्या फोटोवर अगदी मोजक्या ओळी लिहून विनोद निर्माण करणं याला सर्वसाधारणपणे ‘मिम्स’ असं म्हणतात. या मिम्समध्ये सेलिब्रिटींच्या फोटोंचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु अशा प्रकारच्या विनोदावर अभिनेत्री पलक सिंधवानी हिना संताप व्यक्त केला आहे. माझे फोटो वापरुन मिम्स तयार कराल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा धमकीवजा इशारा तिने नेटकऱ्यांना दिला आहे.

अवश्य पाहा – “इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अनुरागने मला खोलीत बोलावलं”, अन्…; अभिनेत्रीचा खुलासा

अवश्य पाहा – “मी कधीही ड्रग्ज घेतले नाहीत”; दिया मिर्झा NCBच्या रडारवर

‘तारक मेहता का उलट चष्मा’ या लोकप्रिय विनोदी मालिकेतून प्रकाशझोतात आलेली पलक सध्या व्हायरल होणाऱ्या मिम्समुळे त्रस्त आहे. “माझ्या नावाने काही मिम्स व्हायरल होत आहेत. मालिकेत मी उच्चारलेले डायलॉग्स या मिम्समध्ये वापरले जातात. विनोदाच्या नावाखाली एखाद्या कलाकाराचा अपमान करणं थांबवा. यामुळे समाजात द्वेष पसरला जातो. यापुढे माझे फोटो वापरुन मिम्स तयार कराल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून पायलने नेटकऱ्यांना धमकीवजा इशारा दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah palak sindhwani viral memes mppg