टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ९’ चे स्पर्धक किश्वर मर्चंट, सुयश राय यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. २७ ऑगस्टला किश्वरने मुलाला जन्म दिला. किश्वर आणि सुयशने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांना देत एक गोंडस फोटो शेअर केला होता. नंतर किश्वर आणि तिच्या बाळाचे -निरवैर रायचे त्यांच्या घरी दणक्यात स्वागत झाले. आता किश्वरने बाळसोबतचा अजून एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकरी फिदा झाल्याचे दिसून येत आहेत. तसंच सुयश रायच्या कमेंटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बुधवारी संध्याकाळी, किश्वर मर्चंटने मुलगा निरवैर रायसोबतचा एक गोड फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला तिने “तुझं कौतुक”असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटो निरवैरला मांडीवर झोपवताना दिसत आहे. तसंच तिने ‘नॉट इंटरेस्टेड’ असं लिहिलेला हुडी घातला आहे. तिचा चेहऱ्यावर ममता दिसत आहे. किश्वरच्या या पोस्टवर नेटकरी बाळाचे आणि आईचे कौतुक करताना दिसत आहेत. बाळाच्या वडिलांनी देखील या पोस्टवर कमेंट करत, “तुझ्यासाठीच वेडा” अशी कमेंट केली.
View this post on Instagram
या महिन्याच्या सुरुवातीला सुयशने त्याच्या कुटुंबासोबत एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या मुलाचे नाव जाहीर केले. या वेळेस त्याने ‘एक ओंकार’ हे गाणं गायले. “निरवैर हे नाव ठेवण्याचे कारण, जेव्हा किश्वरला रात्री झोप येत नसे, तेव्हा ती ‘एक ओंकार’ ऐकायची आणि तिथूनच हे नाव आले.” असे त्याने सांगितले. किश्वर तिच्या गरोदर काळाबद्दल बोलताना ती म्हणाली, “ही अशी गोष्ट होती जी मी कधीच अनुभवली नाही. या ९ महिन्यांत एका स्त्रिच्या शरीराला खुप त्रास सहन करावा लागतो, तिच्यात खुप बदल होत असतात.” तसंच सी-सेक्शन झाल्याने बरीच औषधे घायवी लागत आणि थकवा सुद्धा येत आहे असे ती म्हणाली.