‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. त्यामुळे ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकाविश्वात ही लोकप्रिय मालिका ठरली असून टीआरपीच्या शर्यतीतही पुढे आहे. अजूनही या मालिकेवर प्रेक्षक तितकंच भरभरून प्रेम करत आहेत. अशातच या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर कोणालाही फॉलो न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – अभिनेते मकरंद अनासपुरे यांना दहावीत किती टक्के मिळाले होते? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: “आई तू कधीच देव बाप्पाच्या घरी जाऊ नकोस…”, क्रांती रेडकरने शेअर केला लेकीचा गोड व्हिडीओ, म्हणाली…

काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री रुपाली भोसले हे दोघं ‘लोकसत्ता ९९९’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मिलिंद गवळी यांना इन्स्टाग्रामवर कोणाला का फॉलो करत नाही? याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा ते मजेत उत्तर देत म्हणाले की, मी ज्यांना फॉलो करतो ते माझ्याबरोबर असतात. त्यामुळे मला सोशल मीडियावर कोणाला फॉलो करण्याची गरज नाही.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट व्हायरल होत असतात. दैनंदिन जीवनातील येणारे प्रत्येक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’मधील ‘ही’ अभिनेत्री झळकणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेतही झळकले आहेत. तसेच मिलिंद यांनी मल्याळम चित्रपटात देखील काम केलं आहे.