Ashwini Mahangade Emotional Post : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘अस्मिता’ व ‘आई कुठे काय करते’ अशा काही लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. त्याचबरोबर काही सामाजिक आणि राजकीय विषयांवरही ती तिची मतं व्यक्त करत असते.

अशातच अश्विनीने शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अश्विनीनं सोशल मीडियावर आत्महत्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अश्विनी असं म्हणते, “आनंदी, समाधानी राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? हे समजलं की, सोपं होईल सगळं… बहुतेक… मी आनंदी आहे, मी समाधानी आहे हे जगाला दाखवण्यापेक्षा; आधी आपल्या मनाला ते जाणवायला हवं.”

त्यानंतर अश्विनी म्हणते, “आपल्याबरोबरचा, नेहमी आपल्याशी बोलणारा माणूस अचानक आत्महत्या करतो आणि आपल्या हातात राहतं ते फक्त आणि फक्त त्यावर हळहळ व्यक्त करणं… खरं तर नेमकं आपण काय करायला हवं हे आपल्याला तरी कुठे समजतं. त्यानं तो विचार किती तरी वेळा मनात दाबला असेल, किती तरी वेळा त्यापासून दूर पळालाही असेल; पण कोणाशी बोलला असेल का?”

अश्विनी महांगडे इन्स्टाग्राम पोस्ट

पुढे अश्विनीने म्हटलं, “त्याच्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला कधीतरी त्या कलाकाराच्या मनात खोल आत काय गोंधळ सुरू असतो याची जाणीव असेल का? आत्महत्येचा विचार मनात आला, तर त्यावर मात कशी करायची? नुसती पुस्तकं वाचून खरंच हा विचार बाजूला जाईल का? ‘मी काम शोधतोय किंवा शोधतेय’ हे वाक्य एवढं जड असेल का? किंवा ते बोलून किती वाट पाहिली असेल?”

नंतर ती म्हणते, “खरंच तग धरून राहता यायला हवं म्हणजे काय? ते कसं जमणार? आत्महत्या हा शब्दच मला तिरस्कार करणारा वाटतो. त्याची भयानकता माझ्या जवळचा माणूस जेव्हा आत्महत्या करून गेला तेव्हा समजली. पण तेव्हाही समजलं नाही की, मी काय करायला हवं होतं आणि आजही समजत नाही की, आपण काय करायला हवं होतं. शेवटी आपल्या गरजा कमी असायला हव्यात?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर अश्विनीनं “फक्त एकाच कामावर अवलंबून राहून चालणार नाही, यावर विचार करायला हवा. आपल्या माणसांमध्ये जास्त वेळ घालवायला हवा. का कोणीतरी म्हणायला हवं, तू कशाला काळजी करतेस; मी आहे. कारण- हे म्हणणारा माझा भाऊ माझ्या आयुष्यात आहे”, असं म्हटलं आहे. अश्विनीची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.