‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सध्या बंद होणारी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत.

‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर मालिकेतील आव्हानात्मक सीनविषयी सांगितलं. मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “मालिकेचा ग्राफ कसा जाणार आहे, याचा मला अजिबात अंदाज नव्हता. साधारण स्टोरी लाइन माहित होती. इतकं आपण रिअ‍ॅलिटीला भिडणार काहीतरी करतो आहोत, ही भूमिका इतकं काही आपल्याकडून घेणार आहे, याची मला खरंच कल्पना नव्हती. आजूबाजूला जे काही टेलिव्हिजिनवर त्यावेळेला बघायला मिळत होतं, त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं काहीतरी करतोय याची जाणीव व्हायला लागली होती.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”

“त्यादरम्यान अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो आणि म्हणतो की, तू मला नको आहेस. तुझ्या हाताला मसाल्याचा वास येतोय आणि तू मला आवडत नाहीसं. तिथे तिला पहिला जो शॉक बसतो आणि पॅनिक अटॅक येतो. तर असा एखादा सीन अगदी सुरुवातीला करायला मिळणं. मालिका सुरू झाल्यानंतर दोन महिन्याच्या आतच. जेव्हा तुमच्या टीमबरोबर ओळख व्हायला लागलेली असते. तुम्ही वॉर्म होत असता. त्या काळात असा सीन करणं खूप कठीण होतं. घराच्या मागे दगड आहे तिथे मी पॅनिक अटॅक येऊन बसलेली असते.”

पुढे मधुराणी प्रभुकलकर म्हणाली, “त्याच्यानंतर जेव्हा तिला संजनाबद्दल केलंत. तेव्हा ती खाली पडते. तो सीन फिल्मसिटीमध्ये चित्रीत केला होता. तिच्या आतमध्ये भरलेला ट्रॉमा असतो, तो जोरात किंचाळून त्याला वाट करून देते. असे कितीतरी सीन आहेत. जशी ही शेड करायला मिळाली. तशीच आशुतोषबरोबर रोमँटिक सीन करतानाची शेड मिळाली. प्रत्येक मुलाबरोबर सीन करायला मिळालं.”

हेही वाचा – “सुशांत सिंह राजपूतची हत्याच केली”, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अरुंधती ही एकमेव भूमिका आहे, ज्या भूमिकेला प्रत्येकाबरोबर सीन करायला मिळाले. यांच्याबरोबर खूप जीवाभावाचे सीन करायला मिळाले. इथला प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करतो. मला भारी मजा आली,” असं मधुराणीने सांगितलं.