एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण सध्या चांगलंच वाढलं आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात मंगळवारी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं तरुणीच्या मित्रानंच भररस्त्यात हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत MPSC परीक्षेची तयारी करत असलेल्या लेशपाल जवळगे यानं या पीडित मुलीचा जीव वाचवला. त्याबद्दल आता सर्वत्र लेशपालचं कौतुक होत आहे. अशातच अभिनेते किरण माने यांनी त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आरोपी शंतनू जाधव याचं पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. शंतनू हा तरुणीच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. पीडित तरुणीनं प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं तो तिला त्रास देऊ लागला. मंगळवारी पुण्याच्या सदाशिव पेठेत त्यानं तिला गाठलं आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र तरुणीनं त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या शंतनूनं तिच्यावर कोयत्याने वार केले. हे सगळं घडत असताना लेशपाल त्याच परिसरात होता. शंतनू तरुणीवर कोयत्यानं वार करत असल्याचं दिसल्यावर लगेचच लेशपालनं त्याच्या दिशेनं धाव घेतली आणि तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. असं करत त्यानं त्या तरुणीचा जीव वाचवला.

आणखी वाचा : “‘बकरा’ गळाला लागलाय म्हणून…,” किरण मानेंनी केले आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांना लक्ष्य; पोस्ट चर्चेत

आता लेशपालनं दाखवलेल्या या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करत लेशपालबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी लेशपालचा एक फोटो शेअर करत लिहिलं की, “… प्रोटिन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून, जिममध्ये जाऊन दंडाच्या बेंडकुळ्या फुगवणाऱ्यांपेक्षा पुस्तकं वाचून मेंदूत ते मुरवलेला माणूस जास्त शौर्यवान, धैर्यवान व विद्वानही असतो, हे या भावानं दाखवून दिलं. तुझ्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा लेशपाल!”

हेही वाचा : “वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी…,” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता किरण माने यांनी केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून त्यावर “आम्हाला तुझा अभिमान वाटतो,” असं म्हणत नेटकरी लेशपालचं कौतुक करत आहेत.