छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो नेहमी त्याच्या आगामी चित्रपट नाटकाबद्दल नेहमी विविध पोस्ट शेअर करत असतो. नुकतंच त्याने अभिनेत्री श्रेया बुगडेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने तिच्या कामाबद्दल स्वत:चे मत व्यक्त केले आहे.

कुशल बद्रिकेने नुकतंच इन्स्टाग्रामवर श्रेया बुगडेबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो चला हवा येऊ द्या च्या मंचावरील आहेत. याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. यावर त्याने छान हटके कॅप्शन दिले आहे. यात त्याने श्रेयाच्या कामाबद्दल तिचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “कुशल बद्रिकेने मला जबरदस्ती…” श्रेया बुगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिकेची इन्स्टाग्राम पोस्ट

कधी कधी मला वाटतं की “श्रेया बुगडे” ही “हॅरी पॉटरच्या” शाळेत शिकून आली असेल,
काहीतरी मंत्र पुटपुटून काडी फिरवली की, ही हवं ते रूप घेऊ शकत असेल बहुतेक.
परवाच्या स्किटमद्धे तिला “श्रीवल्लीची” भुमिका होती ज्यात तिला “मुक्ता बर्वे” साकारायची होती, शेवटच्या रीडिंगला ती मुक्ता बर्वेच्या आवाजात बोलू लागली, मग स्टेजवर गेली तर “श्रेया” आणि “मुक्ता” असा द्विपात्री प्रयोग चालू आहे की काय असा भास होऊ लागला.
”श्रेया बुगडे” म्हणून स्वतःच वेगळं अस्तित्व जपून, तिला “उषा नाडकर्णी, शुभांगी गोखले, कंगना, श्रीदेवी, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे वीज, सई ताम्हणकर आणि अशा अनेक….
म्हणजे तिला हवी ती रुपं घेता येतात !! ती काय जादू शिवाय ?
मला पक्की खात्री आहे की ती “HOGWARTS” मधून शिकून आली आहे, आणि तिचे बाबा “ Dumbledore”आहेत.
“आबरा का डाबरा, हवा येऊ द्या पहात रहा” असे कुशल बद्रिकेने म्हटले.

आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान श्रेया बुगडेनेही काही दिवसांपूर्वी कुशल बद्रिकेबद्दल एक गमतीशीर पोस्ट शेअर केली होती. या आधीही श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांनी कायमच एकमेकांबद्दल पोस्ट शेअर केल्या आहेत. ते दोघेही कायमच एकमेकांची मजा-मस्ती करत असतात. फक्त ऑनस्क्रीन नव्हे तर ऑफस्क्रीनही त्या दोघांची धमाल मस्ती पाहायला मिळते. त्या दोघांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या खऱ्या आयुष्यासह सेटवरील गंमती-जंमतीचे फोटो शेअर करताना दिसतात.