scorecardresearch

हातात पत्ते, समोर दारुची बाटली अन्… ओंकार भोजनेच्या नव्या लूकनं वेधलं लक्ष

तो कायमच विनोदी भूमिका साकारत असल्याने त्याच्या या लूकची सध्या चर्चा सुरु आहे.

हातात पत्ते, समोर दारुची बाटली अन्… ओंकार भोजनेच्या नव्या लूकनं वेधलं लक्ष
ओंकार भोजने

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला. यामुळे ओंकार भोजनेच्या चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता लवकरच तो एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने हा आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ओंकार भोजने हा लवकरच एका मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरला एक कोटी असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतंच समोर आले आहे. यात ओंकारच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

ओंकारने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो जुगार खेळताना दिसत आहे. त्याबरोबर समोर दारुची बाटली, दारुने भरलेला ग्लास आणि सिगारेटही पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर चित्रपटाचे नाव लिहिण्यात आले आहे. त्याखाली सत्य घटनांवरुन प्रेरित असे लिहिण्यात आले आहे. याबरोबर या पोस्टरवर जो नशिबालाही डावावर लावतो तोच खरा गॅम्बलर असे लिहिण्यात आले आहे.

आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज

यात ओंकार एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. तो कायमच विनोदी भूमिका साकारत असल्याने त्याच्या या लूकची सध्या चर्चा सुरु आहे. हा चित्रपट नक्की काय आहे आणि ओंकारची त्यात काय भूमिका असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  

सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर  यांनी केले आहे. तर विनोद नाईक कार्यकारी निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या २०२३ च्या २० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 17:40 IST

संबंधित बातम्या