‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नुकतीच त्यांच्या नात्याची कबुली दिली. गेली साडेतीन-चार वर्ष ते एकमेकांना डेट करत असून आता त्यांनी त्यांचा हे नातं सर्वांसमोर आणलं. सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो पोस्ट करत त्यांनी आमचं “ठरलं असं!” लिहिलं.
मुग्धा आणि प्रथमेशची ही पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला तर काहींना याची कल्पना होती असं ते म्हणाले. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांचे चाहते याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील अनेक गायक, कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता एका लोकप्रिय अभिनेत्याने त्यांचं लग्न ठरल्याबद्दल एक खास रील पोस्ट करत काळ कसा पटपट निघून जातो हे सांगितलं आहे.
आणखी वाचा : “मुग्धा-प्रथमेशचंही ठरलं, तू कधी लग्न करणार?” अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन, म्हणाली…
अभिनेता समीर खांडेकर याने एक रील पोस्ट केलं. यात तो आणि अभिनेता विनोद गायकर गप्पा मारत उभे असलेले दिसत आहेत. तेव्हा विनोद समीरला म्हणतो, “सम्या, तुला शेवटचं कधी कळलं की काळ निघून गेला आणि आपलं वय झालंय?” त्यावर समीर म्हणतो, “आज सकाळीच. एक बातमी ऐकल्यावर.” त्यावर विनोदने त्याला विचारलं, “कसली बातमी?” त्यानंतर समीर म्हणाला, “अरे मुग्धा वैशंपायन लग्न करत आहे. असं वाटतंय की काल-परवापर्यंत आपण तिला वोटिंग करत होतो. तुला हे ऐकून कसं वाटतंय सांग?” त्यावर विनोद त्याला म्हणाला, “होय. वय झालंय.”
हेही वाचा : आई किंवा सासूबाई नाही तर मृणाल कुलकर्णींना सून शिवानी रांगोळे मारते ‘ही’ हाक, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
त्या दोघांचं हे मजेदार रील सध्या खूप व्हायरल होत आहे. तर हे रील मुग्धा आणि प्रथमेशलाही आवडलं असून त्या दोघांनी त्यांना हे रील आवडल्याचं सांगत या हटके शुभेच्छांबद्दल त्यांचे त्यांचे आभार मानले.