अभिनेता स्वप्नील जोशी गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. हिंदी मराठी या दोन्ही भाषेत त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत मात्र तरीही त्याची ओळख आजही श्रीकृष्ण म्हणून आहे. स्वप्नील जोशीने नुकतीच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ मालिकांबद्दल आणि त्याच्या ‘भगवान श्रीकृष्णा’च्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

स्वप्नील जोशी सातत्याचे चर्चेत येत असतोच, या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, “करियरच्या सुरवातीलाच रामायण मालिकेतून झाली तर तो अनुभव कसा होता?” त्याने उत्तर दिले, “माझा अनुभव एकदम कमाल होता. लोक मला याबद्दल कायमच विचारत असतात. वयाच्या ९ व्या वर्षी मी ती भूमिका करत होतो ज्या गोष्टी मला माझ्या आजीकडून कळत होत्या. आजी ज्या गोष्टी सांगत होती त्याचा मी हिस्सा होतो, मी अशी भूमिका करत होतो जिथे मला माझे आई वडील, नातेवाईक इतकंच नव्हे तर शाळेतील शिक्षकदेखील हे सांगायचे की तू शाळा बुडव पण ती भूमिका कर. मी एका महाकाव्याचा भाग होतो तेव्हा मी लहान होतो ‘रामायण’ ‘महाभारत’ माझ्यासाठी फक्त गोष्टी होत्या मात्र आता कळतंय की ती आपली संस्कृती, सभ्यता, आपला अभिमान आहे. मी खूप भाग्यवान आहे की ‘उत्तम रामायणा’त ‘कुश’ची भूमिका करू शकलो आणि ‘श्रीकृष्ण’ मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारू शकलो.”

Gandhi Godse Ek Yudh : “तुमच्याकडे एक मोठे हत्यार….” ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

स्वप्नीलने पुढे सांगितले “आजही लोकांचे तितकेच प्रेम मिळते आहे. सध्याचा जमाना आहे २ मिनिटांचा सोशल मीडियावर २ मिनिटात फेम मिळते. २०, २५ वर्षांपूर्वी केलेलं काम आजही लोकांच्या लक्षात आहे यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. करोना काळ संपूर्ण जगासाठी एका दुर्दैवी घटना होती मात्र प्रत्येक वाईट गोष्टीत जशी एक चांगली गोष्ट असते तशी करोनाकाळात ‘रामायण’ ‘महाभारत’ मालिका दाखवण्यात आल्या. आणि या मालिकांनी दाखवून दिले की आजही भारतीयांची पहिली निवड ही ‘रामायण ‘महाभारत’ आहे.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रामायण’ आणि ‘महाभारत’ मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते.स्वप्नील जोशीने साकारलेले भगवान श्रीकृष्णाची भूमिका विशेष गाजली. स्वप्नील जोशी सध्या चला हवा येऊ द्या आणि तू तेव्हा तशी या मालिकेतून आपल्या भेटीस येतो. लवकरच तो आता वाळवी या मराठी चित्रपटात झळकणार आहे, या चित्रपटात त्याच्याबरोबर सुबोध भावेदेखील असणार आहे.