छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. लवकरच बिग बॉसचं १७वं पर्व सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच याचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे सध्या बिग बॉसच्या १७व्या पर्वाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. या पर्वाचा होस्ट अभिनेता सलमान खानच असणार आहे.

हेही वाचा – परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, पहिला फोटो आला समोर

बिग बॉसच्या १७व्या पर्वाची थीम मात्र इतर पर्वापेक्षा वेगळी असणार आहे. या पर्वात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याची सध्या चर्चा सुरू आहे. अशातच पहिल्या निश्चित स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. टेलीव्हिजनवरील हा लोकप्रिय चेहरा आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं सुख कशात आहे माहितेय? जाणून घ्या

हेही वाचा – अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला दिल्या हेल्थ टिप्स; पाहा व्हिडीओ

अलीकडेच बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व संपलं. हे ओटीटीचं पर्व चांगलंच गाजलं. त्यामुळे आता टेलीव्हिजनवरील बिग बॉसच्या १७व्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या पर्वासाठी अभिनेता कंवर ढिल्लो, फैझल शेख अशी अनेक नाव समोर येत आहेत. परंतु, अधिकृतरित्या अजून कोणत्याही नावाची घोषणा झालेली नाही. पण ‘टेलीचक्कर’च्या वृत्तानुसार, यंदाच्या बिग बॉसच्या १७व्या पर्वासाठी अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. ही या पर्वाची पहिली निश्चित स्पर्धक असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा – लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर दुर्दैवी घटना; लाइटमनचा विजेच्या झटक्याने मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाची बिग बॉसची थीम सिंगल विरुद्ध कपल असणार आहे. अंकिता लोखंडेचं नाव कपल विभागासाठी निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. जर असं असेल तर या पर्वात तिच्याबरोबर पती विक्की जैनची देखील एन्ट्री होऊ शकते. दरम्यान, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बिग बॉसचं १७वं पर्व सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.