गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आघाडीचे मराठी कलाकार उद्योजक बनले आहेत. कोणी स्वतःचे क्लोदिंग ब्रँड सुरू केले आहेत, तर कोणी स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. या यादीत नुकतंच अनघा अतुलचं नाव सामील झालं. भगरे गुरुजींची लेक अभिनेत्री अनघा अतुल हिने नुकतंच तिच्या भावाबरोबर मिळून स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. तर या हॉटेलमधील जेवणाच्या चवीबद्दल आणि हॉटेलमधील वातावरणाबद्दल अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

अनघा गेले काही महिने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. तर मालिका संपताच तिने तिचा नवीन व्यवसाय सुरू केला. अनघाने पुण्यातील डेक्कन परिसरात १९ ऑक्टोबरला हॉटेल सुरु केलं. ‘वदनी कवळ’ असं या शुद्ध शाकाहारी हॉटेलचं नाव आहे. या हॉटेलमध्ये खवय्यांना शुद्ध शाकाहारी थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. तिची खास मैत्रीण अभिनेत्री ऋतुजा बागवे नुकतीच्या हॉटेलमध्ये जाऊन आली आणि तिला या हॉटेलचा ॲम्बिअस, या हॉटेलमधील जेवण खूप आवडलं.

आणखी वाचा : Video: ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

ऋतुजाने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं, ” मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की माझी मैत्रीण अनघा भगरे आणि तिचा भाऊ अखिलेश भगरे यांनी ‘वदनी कवळ’ हे नवीन हॉटेल सुरू केलं आहे. वदनी कवळ म्हणताना जितकं सात्विक वाटतं तितकंच सात्विक जेवण मी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवले. या हॉटेलचा ॲम्बिअन्स कमाल आहे आणि अगदी मराठमोळ्या पद्धतीने खूप गोड माणसांनी हे हॉटेल सजवलं आहे. या हॉटेलमध्ये जेवण उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊन जेवणाचा आस्वाद घ्या.”

हेही वाचा : “घर घेतल्यावर आता त्याचा EMI…,” ऋतुजा बागवेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अनघानी हा व्हिडीओ ‘वदनी कवळ’च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करत ऋतुजाचे आभार मानले. या व्हिडीओवर कमेंट करत आता नेटकरी अनघा आणि तिच्या भावाला शुभेच्छा देत आहेत.