सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या ‘अंगारों’ या गाण्याने तर अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाची यांची प्रमुख भूमिका असणारा ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे गाणी देखील सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आली असून सगळ्या भाषांमध्ये ट्रेंड होतं आहेत.

आतापर्यंत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘अंगारों’ या दोन्ही गाण्यांची भुरळ प्रेक्षकांना पडली आहे. पण सध्या ‘अंगारों’ हे गाणं ट्रेंड होतं आहे. या गाण्याच्या तेलुगू व्हर्जनमधील गाण्यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे.

हेही वाचा – Video: अमिताभ बच्चन-अमृता सिंह यांच्या लोकप्रिय गाण्यावर गौरव मोरेसह जबरदस्त डान्स करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखतं का? पाहा व्हिडीओ

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी “वाइब है” असं कॅप्शन देत हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या व अविनाश नारकर अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाप्रमाणे हुबेहूब गाण्याच्या हूकस्टेप करताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे दोघांचा हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या या व्हिडीओवर कलाकारांसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एक नंबर”, “कमाल”, “एकदम भन्नाट”, “याच व्हिडीओची वाट बघत होतो, तुम्ही कधी करताय ते”, “मला तुमची जोडी खूप आवडते”, “मी तुमची चाहती आहे, तुम्ही काय डान्स केलाय…एकदम भन्नाट”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “कृपा करुन आम्हाला जगायला…” लोकसभा निवडणुकीबद्दल शशांक केतकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला…

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील हे गाणं प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने गायलं आहे. तर चंद्रबोस यांनी लिहिलं असून देवी श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. तसंच या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनाची धुरा गणेश आचार्य यांनी सांभाळली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटात अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने आपल्या जबरदस्त डान्स, अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटातील तिचं ‘ऊ अंटवा’ या आयटम साँगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातून समांथाचा पत्ता कट झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. समांथाची जागा आता बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी घेणार आहे.