नव्वदच्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) आणि अविनाश नारकर ( Avinash Narkar ). या लोकप्रिय जोडीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जसं अढळ स्थान निर्माण केलं आहे. तसंच या नारकर जोडीने आपल्या रील व्हिडीओने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही जण त्यांच्या रील व्हिडीओवर टीका करणारे असले तरी अनेकजण नारकर जोडीचे डान्स व्हिडीओ आवडीने पाहत असतात. त्यांचं कौतुक करत असतात.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या कामाव्यतिरिक्त सुंदर फोटो, डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच दिवाळी स्पेशल रील व्हिडीओ ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

या व्हिडीओत, दिवाळी निमित्ताने ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी मराठमोळा लूक केला आहे. ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) गुलाबी रंगाच्या सुंदर पैठणीमध्ये दिसत आहेत. तर अविनाश नारकर पिवळ्या रंगाच्या शेडमधील सुंदर डिझाइन असलेल्या सदरा आणि पांढऱ्या पायजमामध्ये पाहायला मिळत आहेत.

दिवाळी स्पेशल रील व्हिडीओत ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) आणि अविनाश नारकरांनी ‘माझ्या दिलाचो’ आणि ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ या गाण्यांचा मॅशअपवर डान्स केला आहे. दोघांच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलने दिवाळीनिमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, राखी सावंतच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

हेही वाचा – Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यात ‘हा’ सदस्य झाला एलिमिनेट, घराबाहेर जाण्यापासून शिल्पा शिरोडकरसह सुरक्षित झाले ‘हे’ सहा सदस्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) आणि अविनाश नारकरांच्या डान्स व्हिडीओचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. “खरंच हे बॉडिंग खूप छान वाटतं”, “हे दोघं एकमेकांसाठीचं बनले आहेत”, “मस्त”, “छान”, “एक नंबर”, “किती गोड आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.