एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाणारे अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांची जोडी नेहमी चर्चेत असते. अभिनयाबरोबर ही जोडी सोशल मीडियावरील पोस्टमुळेही सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ते अनेकदा त्यांच्या पोस्टमधून एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. तर आता अविनाश नारकर यांच्यासाठी ऐश्वर्या नारकर यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेते अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर त्यांची अनेक रील्स पोस्ट करत असतात. काही रील्स सोशल मीडियावर हिट होतात, तर काहींमुळे त्यांना ट्रोल केलं जातं. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश नारकर यांना रीलवरून अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. तर त्यांना ट्रोल करणाऱ्यांना त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर यांनी गोड शब्दात खडेबोल सुनावले आहेत.

आणखी वाचा : “तुमच्या कपाळावर कसली खूण आहे?” अखेर ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या…

ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांच्याबरोबरचं एक रील पोस्ट केलं. त्यामध्ये ते दोघेजण हॉटेलमध्ये बसून एकमेकांशी छान गप्पा मारताना दिसत आहेत. हे रील शेअर करत त्यांनी लिहिलं, “मला माझी इतकी काळजी करणारं आणि मला पाठिंबा देणारं कुटुंब मिळालं यासाठी मी सदैव ऋणी राहीन. हा गोल्डन हार्ट असलेला माणूस माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. हा असा माणूस आहे जो फक्त त्याच्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही तर जे आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत, गरजू आहेत त्यांची आनंदाने जबाबदारी घेतो. हे करणं नक्कीच सोपं नाही.”

हेही वाचा : Video: डोंगर, नदी अन्…; निसर्गाच्या सानिध्यात अविनाश नारकरांनी गायलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी लिहिलं, “जेव्हा ते त्याला बरंच काही काही बोलून ट्रोल करतात ते पाहून मला खरंच असं वाटतं की तो माणूस म्हणून कसा आहे हे त्यांना माहिती पाहिजे…अत्यंत आनंदी, कुठल्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीचा आदर करणारा… तू हिरा आहेस. देवाचे आशीर्वाद तुझ्यावर कायम राहोत.” आता त्यांचं हे रील आता चांगलंच चर्चेत आलं आहे.