ऐश्वर्या नारकर यांना मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. ‘या सुखांनो या’, ‘लेक माझी लाडकी’ या गाजलेल्या मालिकांमधून त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी आपला फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून ऐश्वर्या त्यांच्या चाहत्यांना वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अनेक अपडेट्स देत असतात. त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सध्या स्वत:चं हक्काचं घर खरेदी करून आपलं स्वप्न पूर्ण करत आहेत. चाहत्यांना आपल्या लोकप्रिय कलाकारांची घरं कशी असतात हे पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या रील्स व्हिडीओमध्ये नेहमीच त्यांच्या घराची झलक दिसते. यावेळी अनेक नेटकरी या जोडप्याकडे घराचा संपूर्ण व्हिडीओ शेअर करण्याची मागणी करतात. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने आपल्या घराची लहानशी झलक त्यांच्या चाहत्यांना दाखवली आहे.

हेही वाचा : Video : अखेर अर्जुनसमोर येणार साक्षी-चैतन्यच्या नात्याचं सत्य! ‘ठरलं तर मग’च्या विशेष भागात काय घडणार? पाहा प्रोमो

अभिनेत्रीने “स्वीट होम” असं कॅप्शन देत राहत्या घराचा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरातील मोठ्या हवेशीर खिडक्या, छोटी झाडं, आकर्षक इंटिरियर व प्रशस्त खोल्यांची झलक पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेत्रीच्या घरातील सुंदर असा झोपाळा या व्हिडीओमध्ये सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतो. नारकर जोडप्याच्या या साध्या अन् सुंदर अशा घराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : आमिर खानच्या चित्रपटात झळकणार देशमुखांची सून! जिनिलीया पोस्ट शेअर करत म्हणाली, “१६ वर्षांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी अभिनेत्रीच्या घरातील सुंदर सजावटीचं भरभरून कौतुक केलं आहे. “मॅडम तुमचं घर अतिशय सुंदर आहे”, “कमाल घर”, “मॅडम तुमचे घर खूप छान आहे आणि निसर्गरम्य वाटते” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर आल्या आहेत.