टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. आवडत्या मालिका बंद होणार असतील तर प्रेक्षकांना वाईट वाटते. तसेच त्या मालिकेतील कलाकारांनादेखील प्रेक्षकांचा निरोप घेताना, ते साकारत असलेल्या पात्राला निरोप देताना वाईट वाटते. आता झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'( Satvya Mulichi Satvi Mulgi) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतील एका सहकलाकारासाठी शेअर केलेली पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काय म्हणाल्या ऐश्वर्या नारकर?

ऐश्वर्या नारकर यांनी वीराबरोबर एक डान्सचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “आम्ही या पात्रासाठी एकत्र शेवटचे एकदा काम करत आहोत, हे माझ्यासाठी खूप खास आहे. पुढे त्यांनी मालिकेत रीमाची भूमिका साकारणारी बालकलाकार वीरा नेवालेला टॅग करत लिहिले, “माझी क्युटी पाय. अतिशय उत्तम कलाकार, खूप छान वागणारी मुलगी, लव्ह यू. खूप मोठी हो. तू खूप गोड आहेस. मी तुझ्याबरोबर सीन्स शूट करणे खूप मीस करेन. थँक्यू”, असे म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर या शतग्रीवच्या पेहरावात दिसत आहेत. या व्हिडीओवर त्यांनी “शतग्रीव आणि विरोचक वन लास्ट टाईम” असे लिहिले आहे. ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. यामध्ये अविनाश नारकर यांचादेखील समावेश आहे. त्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले, ” व्वा, एकदम कडक”, तर सुरुची अडारकरने, “क्यूट”, असे म्हणत कौतुक केले. अभिनेता सिद्धार्थ बोडकेने हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी तुमच्या मालिकेची आठवण येईल असे म्हटले आहे.

हेही वाचा: Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर यांनी रूपाली, विरोचक, शतग्रीव व मैथिली अशा भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. नकारात्मक व सकारात्मक दोन्ही भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.