आली रे आली आता दीपिका पदुकोणची बारी आली; रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम ३'मध्ये साकारणार महिला पोलिसाची भूमिका | singhan again movie director rohit shetty announce film lead actress deepika padukone play lady cop see details | Loksatta

आली रे आली आता दीपिका पदुकोणची बारी आली; रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम ३’मध्ये साकारणार महिला पोलिसाची भूमिका

‘सिंघम’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची रोहित शेट्टीने घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटामध्ये लेडी सिंघम कोण असणार? हेही त्याने सांगितलं.

singham again cast singham again
'सिंघम' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची रोहित शेट्टीने घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटामध्ये लेडी सिंघम कोण असणार? हेही त्याने सांगितलं.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी उचलून धरलं. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. ‘सिंघम अगेन’बाबत रोहित शेट्टीने स्वतः खुलासा केला आहे. ‘सर्कस’ चित्रपटामधील ‘करंट लगा’ गाण्याच्या लाँचिंगदरम्यान रोहितने ‘सिंघम अगेन’बाबत भाष्य केलं. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा – Video : “तू हात उचलायच्या लायकीचा…” अक्षय व प्रसादमध्ये हाणामारी, धक्काबुक्की केली अन्…

रोहितसह रणवीर सिंग, दीपिका पदुकोण ‘करंट लगा’ गाण्याच्या लाँचिंगसाठी पोहोचले होते. यावेळी ‘सिंघम अगेन’मध्ये लेडी सिंघमची भूमिका कोण साकरणार? याबाबत रोहितने स्वतः खुलासा केला आहे. रोहितने केलेली घोषणा ऐकून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.

रोहित म्हणाला, “लोकांना कुठून ना कुठून तरी माहिती ही मिळणारच. त्यापेक्षी मीच या चित्रपटातील अभिनेत्रीबाबत सांगतो. प्रत्येकवेळी लोक मला विचारतात की लेडी सिंघम कधी येणार? तर ‘सिंघम ३’मध्ये लेडी सिंघमची भूमिकी दीपिका पदुकोण साकारणार आहे.”

आणखी वाचा – Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्…; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल

पुढे रोहित म्हणाला, “दीपिका माझी लेडी कॉप आहे. २०२३मध्ये आम्ही या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करू.” माझ्याशिवाय ‘सिंघम ३’ बनूच शकत नाही असं रणवीर यावेळी म्हणाला. म्हणजेच पुन्हा रणवीर या चित्रपटात दिसणार असल्याचंही समोर आलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 15:05 IST
Next Story
विवाहित धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याला हेमा यांच्या वडिलांचा होता विरोध, रागात कॉलर पकडली अन्…