कलर्स वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मालिकेतील लतिका व अभिमन्यूची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसारखं त्यांच्यातलं ऑफस्क्रीन बॉण्डिंगही खूप चांगलं आहे. त्यांचे अनेक फोटो ती दोघं शेअर करत असतात. पण आज समीरच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आज अभिनेता समीर परांजपे याचा वाढदिवस आहे. यानिमित्त अक्षययाने त्यांचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना तिने समीरला हटके शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव

समीर आणि अक्षयाचे फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “माझी सर्वात लाडकी नावडती व्यक्ती…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला तुझ्या तोंडावर तुला महत्त्व द्यायला आवडत नाही. पण माझ्यासाठी तू खूप महत्त्वाचा आहेस. तू जितका माझा अपमान करतोस तितका मी तर कोणालाही करू देत नाही. ते कौशल्य तुझ्याइतकं दुसऱ्या कोणातही नाही. मी माझा ग्लास आणि माझा हिरो विसरणार नाही. वाढदिवसाचं गिफ्ट पोहोचलं आहे, पार्टीची वसुली लवकरच करेन.”

हेही वाचा : Video: “दिसणं, शरीरापेक्षा व्यक्ती म्हणून तुम्ही कोण हे महत्वाचं”- अक्षया नाईक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षयाच्या या हटके शुभेच्छांना समीरनेही कमेंट करत धन्यवाद दिले आहेत. “तू खूप छान लिहिलं आहेस,” असं तो कमेंट करत तिला म्हणाला. समीरबरोबरच अक्षया आणि समीरच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या ऑफस्क्रीन बॉण्डिंगचंही भरपूर कौतुक केलं आहे. अक्षयाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.