‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो घराघरात तितक्याच आवडीने पाहिला जातो. या पर्वामध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार सहभागी झाले होते. त्यात काल या पर्वाचे पाहिले एलिमिनेशन पार पडले. यावेळी निखिल राजेशिर्के हा ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक ठरला. या पर्वाचा तिसरा आठवडा आता सुरु झाला आहे. त्यामुळे हळूहळू स्पर्धकांचा रागीट चेहराही दिसू लागला आहे.

आणखी वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावण्यासाठी सज्ज

नुकताच या शोच्या नवीन एपिसोडचा एक प्रोमो आउट झाला आहे. त्यानुसार आज घरामध्ये “फटा पोश्टर निकला झिरो” हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. यावेळी सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणाला नॉमिनेट करणार ? आणि कोणाला सेफ ? कोण घराबाहेर जाईल ? हे आजच्या भागात समोर येणार आहे. या कार्यादरम्यान यशश्री मसुरकर आणि अमृता देशमुखमध्ये जोरदार भांडण झाले.

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओत यशश्रीने अमृताला नॉमिनेट केलं आणि त्यांच्यात भांडण झाल्याचं दिसून आलं. त्यांनतर अमृता देशमुखने वरच्या आवाजात यशश्रीला म्हटलं, “स्वतः काहीतरी विक्षिप्तासारखं वागायचं…, ज्या लोकांच्या जीवावर उड्या मारते आहेस ना त्यांच्यासाठी तरी कर. दुसऱ्याला घेऊन जाते खड्ड्यात. हे सगळं अमृता बोलत असताना यशश्रीलाही राग अनावर झालेला दिसला. तीही चिडून म्हणाली, “मी इथे तुला प्रूफ करायला आले नाहीये, मी कोणाच्या जीवावर उड्या मारत नाहीये.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीने स्पष्ट केले लग्न न करण्याचे कारण, म्हणाली, “आपल्या इंडस्ट्रीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिग बॉस मध्ये ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. तर आधीच्या पर्वांप्रमाणेच महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यापासूनचे या घरात भांडणाचे आणि मतभेदांचे सूर लागलेले पाहायला मिळाले होते. तर पुढे या स्पर्धेत काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.