Sairaj Kendre Dance Video : “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रे घराघरांत लोकप्रिय झाला. या गाण्यातील साईराजच्या क्युट अन् निरागस एक्स्प्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चिमुकला साईराज हे गाणं व्हायरल झाल्यावर रातोरात इन्स्टाचा स्टार झाला होता. यानंतर या बालकलाकाराला ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत काम करायची संधी मिळाली.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, साईराजने साकारलेली छोट्या सिंबाची ( अमोल अर्जुन कदम ) भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली.

साईराज इन्स्टाग्रामवरील विविध ट्रेंडिग गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतो. त्याचं अकाऊंट त्याचे आई-बाबा हँडल करतात. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय संगीतकार प्रशांत नक्तीचं ‘मराठी ठेका’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. हे गाणं रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे. तसेच या गाण्यात इरिना रुडाकोवा, तश्वी भोईर, अपूर्वा पाटील, विशाल फाळे आणि निक शिंदे असे बरेच कलाकार झळकले आहेत.

याच ‘मराठी ठेका’ गाण्यावर चिमुकल्या साईराजने जबरदस्त डान्स केला आहे. “मराठी ठेका लय ग्वाड हाय…” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावरील साईराजचे एक्स्प्रेशन्स, त्याची एनर्जी पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या व्हिडीओवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत साईराजच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणाऱ्या शिवानी नाईकने “बबड्या…” अशी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.

तर, अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा साईराजच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “डान्स एकदम भारी”, “झकास एकदम”, “लय भारी”, “बबड्या लय भारी”, “छोटे सरकार लय भारी” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. साईराजच्या या डान्स व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, साईराज महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेल्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने १५ मार्च २०२५ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने जवळपास अडीच वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं.