‘खुपते तिथे गुप्ते’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची २ पर्वे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अनेक वर्षांनी या कार्यक्रमाचं तिसरं पर्व ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पण आता अचानक हा कार्यक्रम संपणार असल्याची घोषणा करण्यात आली. हा कार्यक्रम का बंद होत आहे याचं उत्तर आता अवधूत गुप्तेने दिलं आहे.

या कार्यक्रमाचं हे तिसरं पर्व खूप गाजलं. या पर्वामध्ये राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अमोल कोल्हे, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. तर या पर्वाच्या शेवटच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि तो भाग या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा शेवटचा भाग असेल.

आणखी वाचा : “किती वाईट दिवस आलेत गुप्तेवर…”, ‘खुपते तिथे गुप्ते’वर प्रेक्षक नाराज, अवधूतला ट्रोल करत म्हणाले…

या पर्वामध्ये सहभागी झालेल्या पाहुण्यांच्या वक्तव्यामुळे हे पर्व चर्चेत राहिलं. तर दुसरीकडे या कार्यक्रमामध्ये राजकारणी आणि नेते मंडळींना बोलवल्यामुळे प्रेक्षक नाराजही झाले. अनेकांनी त्यामुळे या कार्यक्रमाला आणि अवधूत गुप्तेला ट्रोल केलं. तर अवधूत गुप्तेने नुकताच या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्याखाली कॅप्शनमध्ये हा शेवटचा भाग असल्याचं म्हटलं गेलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर प्रतिक्रिया देत अनेकांनी हा कार्यक्रम खूप लवकर संपत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. तर आता अवधूतने हा कार्यक्रम १६ भागांमध्येच का संपवला जात आहे याचं कारण सांगितलं आहे.

हेही वाचा : “उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला काय वाटलं?” राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत अवधूतने म्हटलं, “हा कार्यक्रम अचानक बंद केला जात नाहीये तर आमचं आधीच ठरलं होतं की हे पर्व १६ भागांचं करायचं आहे. त्यानुसार आम्ही हे पर्व संपवत आहोत. आता आमचं प्रोडक्शन असलेलं ‘सुर नवा ध्यास नवा’चं नवीन पर्व प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत आणि त्याची सुरुवात होत आहे.” तर आता अवधूतने दिलेलं हे उत्तर चर्चेत आलं आहे.