Bharti Singh Battles Fever Weakness: भारती सिंग तिच्या कॉमेडीमुळे घरांघरांत पोहोचली आहे. सध्या ती ‘लाफ्टर शेफ- अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या कार्यक्रमात काम करताना दिसत आहे. भारतीच्या विनोदबुद्धीचे अनेकांकडून कौतुक होते.

भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर केले, त्यावेळी भारती थायलंडला गेली होती. त्यावरून तिला मोठे ट्रोल केले होते. अभिनेत्री तिच्या युट्यूब व्हिडीओमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने बँकॉक परत आल्यावर ती आजारी पडल्याचे तिने सांगितले आहे.

थायलंडहून परत आल्यानंतर मला…

भारती सिंगला सतत ताप येत असून तिने नुकतीच रक्ताची तपासणी केल्याचे म्हटले आहे. भारती म्हणाली, “हर्षने कोणालातरी रक्त तपासणीसाठी घरी बोलावले होते. गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती बिघडली आहे. थायलंडहून परत आल्यानंतर मला अशक्तपणा जाणवत आहे. मला ताप आहे. त्यामुळे मला काळजी वाटत आहे. म्हणून आता रक्ताची तपासणी केली आहे. मला या सगळ्याची खूप भीती वाटते. अशक्तपणामुळे उभेही राहता येत नाहीये.”

भारती सिंग पुढे असेही म्हणाली, “रक्त तपासणीमुळे सकाळपासून रडत आहे. पण, ते करणेदेखील गरजेचे होते. मी लवकरच संपूर्ण शरीराची तपासणी करणार आहे. पण, मला सिरिंजची खूप भीती वाटते. आजच्या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण लोक कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जात असल्याचे ऐकायला मिळत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमची जीवनशैलीमध्ये सुधारणा करा. मीसुद्धा माझ्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारती अनेकदा तिच्या व्हिडीओमधून तिच्या घरातील गोष्टी दाखवते. तिचा पती हर्ष व मुलाबद्दलही अनेकदा बोलते. तसेच, तसेच ती अनेक किस्से सांगताना दिसते. ‘लाफ्टर शेफ- अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या कार्यक्रमातूनही ती प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. त्याचदरम्यान अभिनेत्री सुट्ट्यांसाठी थायलंडला गेली होती. त्यामुळे चाहत्यांनी तिला मोठे ट्रोल केले होते. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेल्यामुळे ती भावुकदेखील झाली होती. ‘तुमचे कुटुंब अमृतसरमध्ये असताना तुम्हाला थायलंडमध्ये राहण्याची लाज वाटली पाहिजे’, देशात तणाव वाढत आहे आणि तुम्ही थायलंडमध्ये फिरत आहात’, अशा प्रकारच्या कमेंट्स करीत चाहत्यांनी तिला ट्रोल केले होते.