‘बिग बॉस हिंदी १६’चा महाअंतिम सोहळ्यात शिव ठाकरे व रॅपर एमसी स्टॅनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर एमसी स्टॅने सर्वाधिक वोट मिळवत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. एमसी स्टॅन व शिव ठाकरे या दोघांमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात घट्ट मैत्री झाली होती. ‘बिग बॉस’च्या घरातील या मित्रांची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती.

‘बिग बॉस’च्या घरातील हे बेस्ट फ्रेंड्स यंदाच्या पर्वातले टॉप २ कन्टेस्टंट ठरले. एमसी स्टॅनने ट्रॉफी नावावर केली तर शिव ठाकरे यंदाच्या पर्वाचा फर्स्ट रनर अप ठरला. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी थोडक्यासाठी हुकली असली तरी शिव ठाकरेची इच्छा मात्र पूर्ण झाली. अंतिम सोहळ्याच्या आधी ‘बिग बॉस’मधील टॉप ५ स्पर्धकांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी शिव ठाकरेने एमसी स्टॅनबाबतची एक इच्छा बोलून दाखवली होती.

हेही वाचा>> Bigg Boss 16: दीड कोटींची चेन, ८० हजारांचे बूट अन्…; ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनची एकूण संपत्ती माहीत आहे का?

“एमसी स्टॅन जिंकला तर मला आनंद होईल. पण जर मी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी नावावर केली, तर मला जास्त आनंद होईल” असं शिव म्हणाला होता. याबरोबच शिवने एमसी स्टॅनसह ‘बिग बॉस’च्या घरातील लाइट्स बंद करुन बाहेर पडण्याची इच्छाही व्यक्त केली होती. “एमसी स्टॅन आणि मी ‘बिग बॉस’च्या घरातून शेवटी लाइट्स बंद करुन बाहेर पडावं अशी माझी इच्छा आहे. सलमान खान सरांच्या एका हातात माझा व दुसऱ्या हातात एमसी स्टॅनचा हात असेल. आणि आमच्यापैकी एकाचा हात उचलून ते विनर घोषित करतील, हे माझं स्वप्न आहे” असं शिवने सांगितलं होतं.

हेही वाचा>> “जे व्हायचे ते झालं आणि ट्रॉफी…”, बिग बॉस १६ मधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाचा विजेता ठरला नसला तरी त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. शिव ठाकरे ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मानला गेला होता. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठी शिव व प्रियंका चौधरी यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, एमसी स्टॅनने सर्वाधिक वोट मिळवत बाजी मारली आणि ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.