महाअंतिम सोहळ्यापूर्वीच 'बिग बॉस १६'च्या टॉप तीन सदस्यांची चर्चा, मराठमोळ्या शिव ठाकरेला स्थान मिळणार का? | bigg boss 16 top 3 contestants name revealed on social media shiv thakare priyanka choudhari mc stan in finale see details | Loksatta

महाअंतिम सोहळ्यापूर्वीच ‘बिग बॉस १६’च्या टॉप तीन सदस्यांची चर्चा, मराठमोळ्या शिव ठाकरेला स्थान मिळणार का?

‘बिग बॉस १६’ शोचे टॉप ३ स्पर्धक कोण असणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

bigg boss, bigg boss 16 Shiv Thakare
‘बिग बॉस १६’ शोचे टॉप ३ स्पर्धक कोण असणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘बिग बॉस १६’ शोचा ग्रँड फिनाले काही अवघ्या काही दिवसांवर आहे. या शोमधील शेवटच्या नॉमिनेशन कार्यामध्ये सुम्बुल तौकीरला घराबाहेर पडावं लागलं. तर निमृत कौरचाही प्रवास अर्धवट राहिला. निमृतलाही या घरामधून प्रेक्षकांच्या लाइव्ह वोटनुसार बाहेर पडावं लागलं. आता घरामध्ये फक्त शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतम हे पाच सदस्य राहिले आहेत.

आणखी वाचा – वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

आता या पाच सदस्यांमध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ सुरू आहे. टॉप पाच सदस्यांची नावं समोर आल्यानंतर टॉप तीन सदस्य कोण असणार? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ‘द खबरी’च्या वृत्तानुसार घरातील तीन टॉप सदस्यांची नावं समोर आली आहेत.

निमृतनंतर अर्चना गौतम घरातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे. टॉप ४मध्ये शालीन भानोतची एण्ट्री होईल. मात्र फिनाले दिवशी शालीनही सगळ्यांच्या आधी घराबाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच शिव, एमसी स्टॅन, प्रियांका चौधरी टॉप तीनमध्ये असणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…

शिवचा खेळ थोडा कमजोर होत असल्याचंही सोशल मीडियावर बोललं जात आहे. तर बरेच जण त्याला पाठिंबा देत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी शिवला वोट करा अशा पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केल्या आहेत. आता या टॉप तीन स्पर्धकांमध्ये नक्की कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घरी घेऊन जाणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:58 IST
Next Story
Video: कुराणवर हात ठेवत राखी सावंतसमोरच आदिलने घेतली होती शपथ; अटक झाल्यानंतर व्हिडीओ व्हायरल