लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १६’ आज संपणार आहे. आज ‘बिग बॉस १६’ च्या ग्रँड फिनालेमध्ये शोला विजेता मिळेल. बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करतो. हा हंगाम मागील सर्व हंगामांपेक्षा खूप वेगळा आहे. या सीझनमध्ये बर्‍याच नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे हा शो एक्स्टेंड करण्यात आला होता.

Video: डीप नेक ब्लॅक अँड व्हाईट गाऊन अन् हिरवा नेकलेस; रिसेप्शन पार्टीत कियाराच्या हटके लूकने वेधलं लक्ष

बिग बॉसदेखील या सीझनमध्ये पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धकाप्रमाणे खेळताना दिसले. हा हंगाम जोरदार व सुपरहिट ठरला. शोच्या वेगळेपणामुळे, यावेळी निर्मात्यांनी शोची ट्रॉफी खूप वेगळी डिझाईन केली आहे. चमकणाऱ्या या ट्रॉफीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Photos: सिद्धार्थ-कियाराच्या ग्रँड रिसेप्शनला अवतरलं बॉलिवूड; कलाकारांचे खास लूक पाहिलेत का?

‘बिग बॉस सीझन १६’ मध्ये घोडा हा शब्द बर्‍याच वेळा वापरला गेला आहे. शोच्या निर्मात्यांनी सीझन १६ ची ट्रॉफी देखील घोड्याच्या आकारात बनवली आहे. ही ट्रॉफी खूप खास आहे. या ट्रॉफीमध्ये गोल्ड आणि हिऱ्यांचे काम करण्यात आले आहे. या ट्रॉफीच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर, रिपोर्टनुसार, हिरे आणि सोन्याने बनवलेल्या या ट्रॉफीची किंमत ९ लाख ३४ हजार रुपये म्हणजेच सुमारे १० लाखांच्या घरात आहे. या ट्रॉफीवर डायमंड वर्क आहे आणि त्यावर बिग बॉसचा लोगो देखील आहे.

Bigg Boss 16 Grand Finale 2023 : हे’ असणार ‘टॉप २’ सदस्य? अमरावतीचा मराठमोळा शिव ठाकरे ऐनवेळी घराबाहेर पडणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस १६’ च्या विजेत्याची घोषणा थोड्याच वेळात केली जाईल. प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांच्या नावाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या सीझनचा विजेता कोण ठरणार हे सलमान खान थोड्याच वेळात जाहीर करेल. शोच्या बक्षिसाची रक्कम २१ लाख ८० हजारांवरून ३१ लाख ८० हजार करण्यात आली आहे.