१२ फेब्रुवारी रोजी बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला. मराठमोळ्या शिव ठाकरेला हरवत रॅपर एमसी स्टॅन बिग बॉसचा विजेता ठरला. बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकल्यावर एमसी स्टॅनवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शो जिंकल्यानंतर स्टॅनने सोशल मीडियावर काही विक्रम रचले आहेत. एका विक्रमात त्याने किंग विराट कोहलीला मागे टाकलं, तर दुसऱ्या विक्रमात त्याने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे.

विराटच्या पोस्टपेक्षा जास्त लाइक्स

ज्या दिवशी बिग बॉसचं १६ वं पर्व संपलं त्या दिवशी साधारण एकाच वेळी एमसी स्टॅन व विराट कोहली यांनी सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या. एमसी स्टॅनने त्याचा बिग बॉसची ट्रॉफी घेतलेला फोटो पोस्ट केला तर विराट कोहलीने भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली. विराट इंस्टाग्रामवर भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्या पोस्टला सर्वाधिक लाईक आणि कमेंट्स असतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र एकाच वेळी टाकलेल्या त्या पोस्टवर विराटला २० लाख लाईक्स होते तर एमसी स्टॅनला ६० लाख लाईक्स होते.

एमसी स्टॅन ठरला किंग! ‘बिग बॉस १६’ विजेत्याने ‘या’ बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे

आता शाहरुखला टाकलं मागे

बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅन पहिल्यांदाच १६ फेब्रुवारीला रात्री १० वाजता इन्स्टा लाईव्हवर आला. तो लाइव्ह आल्यावर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तो 10 मिनिटे इन्स्टा लाईव्हवर आला आणि त्याने त्याचं गाणं गायलं. त्याचं इन्स्टा लाइव्ह पाहून इतके चाहते आणि सेलिब्रिटी सामील झाले की पुन्हा एकदा एमसी स्टॅनने एक नवीन विक्रम रचला आहे.

एमसी स्टॅनचे लाइव्ह व्ह्यू अवघ्या १० मिनिटांत 541K पर्यंत झाले. म्हणजेच तो लाइव्ह असताना ५ लाख ४१ हजार लोक त्याला पाहत होते. इतके जास्त व्ह्यूज असणारा एमसी स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. या नव्या विक्रमासहही एमसी स्टॅनने शाहरुख खानला मागे टाकले आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाईव्हवर २५५ के व्ह्यूज आले आहेत.

एमसी स्टॅनच्या लाइव्हचा जगातील टॉप टेन लाइव्हमध्ये समावेश

एमसी स्टॅनने काही मिनिटांसाठी इन्स्टा लाइव्हवर येताच इतिहास रचला. त्याचे इन्स्टा लाइव्ह हे जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप १० लाइव्हपैकी एक ठरले आहे. या इंस्टा लाइव्हला क्रिस्टियानो रोनाल्डो, ड्रेक, निकी मिनाज आणि बीटीएस मेंबर जंगकूक आणि तायह्युंग यांच्याकडून लाइक्स मिळाले आहेत.

स्टॅनने नव्या टूरची केली घोषणा

रॅपर आणि ‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅनने संपूर्ण भारतात दौर्‍याची घोषणा केली आहे. त्याच्या पॅन इंडिया टूरची घोषणा होताच मुंबई आणि पुण्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावरून बिग बॉसच्या आधी आणि नंतर एमसी स्टॅनची लोकप्रियता किती वाढली आहे, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. सध्या एमसी या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे.